अज्ञानाधारित अभ्यासक्रम
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) २०२१ पासून ज्योतिष विषयाचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा) प्रारंभ करण्याचे घोषित केले आहे. “आकाशातील ग्रह-तार्यांचा मानवी जीवनावर सतत परिणाम होत असतो.” हे ज्योतिष विषयाचे पहिले गृहीतक आहे. खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की मानवी जीवनावर ग्रहतार्यांचा कोणताही परिणाम होत नाही; असे निरीक्षणांवरून सिद्ध झाले आहे. म्हणजे इग्नूच्या या अभ्यासक्रमासाठी कोणतेही सत्य गृहीतक नाही. …